About Shriram Niketan
श्रीरामनिकेतन या परिचय पुस्तकामध्ये संपूर्ण केळकर घराण्याची थोडक्यात माहिती या परिचय पुस्तिकेमध्ये अंतर्भुत केलेली आहे. श्रीरामनिकेतन हे पारमार्थिक मंदिर असून येथे दररोज वेगवेगळ्या संप्रदायांचे /पंथांचे लोक दर्शनास येत असतात. तथापि त्यांना या पारमार्थिक मंदिराविषयी जादा माहिती नसते.
Read More
About Dasram Maharaj
श्रीराम गोविंद केळकर तथा श्रीदासराममहाराज हे जन्मजात ज्ञानी होते. कारण त्यांना भक्त प्रल्हादाप्रमाणे आईचे उदरातच अनुग्रह प्राप्त झाला होता. सौ.इंदिरादेवींना दासराममहाराजांचेवेळी गर्भवती असतानाच भ.स.तात्यासाहेबमहाराज कोटणीसांचा अनुग्रह प्राप्त झाला होता. परमेश्वरी योजना, त्याचवेळी दासरामहाराजांनाही अनुग्रह प्राप्त झाला. त्यामुळे "गर्भी म्हणे सोहं सोहं | बाहेरी पडता म्हणे कोहं |" ही समर्थोक्ती दासराममहाराजांचे बाबतीत लागू होत नाही. ते सोहं साधनेतच अवतरले, आयुष्यभर तेच सोहंसाधन साधले व शेवटी सोहंस्वरुपाकार होऊन गेले. हेच त्यांचे खरे चरित्र आहे.
Read More
Daily Program
श्रीदासराममहाराज केळकर, सांगली यांना श्रुत झालेली कानडी पदे. ही पदे त्यांना भगवान सद्गुरू श्रीनिंबरगिकरमहाराज यांचे कडून, श्रीनिंबरगिकरमहाराजांनी देह ठेवल्यावर, नाद व प्रकाश रूपाने मिळाली.
Read More