भगवान श्रीसोमेश्वरांपासुंन श्रीरेवणसिद्ध् प्रगट झाले . श्रीरेवणसिद्धांचा अवतार क्रुत युगात झाला.श्री रेवणसिद्धांचे शिष्य श्रीमरुळसिद्ध, तर श्रीरेवणसिद्धांचे अवतार श्रीकाडसिद्ध व श्रीहालसिद्ध. या तिन सिद्धाना सिद्धत्रयी असे म्हंटले जाते.हे तीन ही सिद्ध् विरशैव पंथाशी संबंधित आहेत. रेवणसिद्ध व रेवणनाथ हे दोन वेगवेगळे होते का एकच होते,या वादात आपण पडावयास नको,पण दोघेही एकरुप, शिवरुप होते असे म्हणण्यास काही प्रत्यवाय आहे असे वाटत नाही.जे सगळ्या सिद्धांचे गुरु आहेत तेच श्रीमच्छेंद्रनाथांचे गुरु आहेत.मुळ जाणले की मतभेद राहात नाहित,हे लक्शात घेणे महत्वाचे.या रेवणसिद्धांचे पायी नमन करुनच श्रीमामामहाराजांचा श्रीरामपाठ पूर्ण सांग झाला.सांगली जिल्ह्यातिल विटे ग्रामाजवळिल रेणावी या गावी तसेच कोल्लिपाकी गावी रेवणसिद्धांचे पुरातन मंदिर आहे.