Shri Dasram Maharaj Kelkar

श्री निंबरगीकर महाराज

श्री निंबरगीकर महाराज

भ.स.श्रीनिंबरगीकरमहाराजांचा अवतार मिसाळकर यांचे कुळी मातुलग्रुही सोलापुर येथे चैत्र शुद्ध पौर्णिमा शके1712 रोजी झाला.वयाचे पाचवे दीवशी श्रीकाडसिद्धमहाराजानी जंगमवेशात महाराजाना मंत्रानुग्रह देवुन लिंगधारणा केली.यथावकाश सिद्धसाधनाने गुरुलिंगजंगम पदावर आरुढ होवुन महाराजानी साधन संप्रदायाची मुहुर्तमेढ रोवली.शरणागत मुमुक्शुना सिद्धसाधनाचा उपदेश केला.शिष्यांच्या शंकानिरसनार्थ ते प्रवचनही करीत.साधनाभ्यासाने महाराजांचे अनेक शिष्य सिद्ध पदास पोचले.चिमडचे रघुनाथप्रिय साधुमहाराज हे श्रीमहाराजांचे अधिकारी पट्ट शिष्य होत.परमेश्वरी इच्छेने आपले निर्धारीत कार्य पुर्ण झाल्यावर श्रीमहाराजानी निजधामास जाण्याचे ठरवीले.योग्य ती निरवानिरव करुन चिमडचे महाराजांचेकडे सर्व परमार्थ सोपवुन चैत्र शुद्ध 12 शके 1807 रोजी 'भजनपुजन साधुनी बळे'हा श्रीतुकाराममहाराजांचा अभंग म्हणुन शिवस्मरणात महाराज शिवस्वरुप झाले.देह ठेवल्यावर 52वर्षानी श्रीदासराममहाराजांचे शंकानिरसनार्थ श्रीनागाप्पाण्णामहाराजांचे वचनाप्रमाणे श्रीमहाराजानी कानडीतुन बोध केला.श्रीमहाराजानी आपल्या हृदयातील कप्प्यातील कप्प्यातले श्रीदासराममहाराजांचे हृदयात ओतले व द्वैत न मोडता श्रीदासराममहाराजाना आपल्यासारखे केले.श्रीमहाराजानी जो बोध श्रीदासराममहाराजाना केला तीच ही श्रीगुरुलिंगगीता.श्रीगुरुलिंगगीता हे महाराजांचे सगुण रुप आहे.