Shri Dasram Maharaj Kelkar

श्री लक्ष्मीबाई आक्का

श्री लक्ष्मीबाई आक्का

महायोगिनी श्रीलक्श्मीबाई अक्का यांचा अवतार शके1769 मध्ये झाला.मातोश्री भगवंतौवा यानी आपली परिस्थिती पाहून मुलगी थोडी मोठी झाल्यावर तिची पारमार्थिक आवड पाहून श्रीनिंबरगीकरमहाराजाना आपले मुलीस सांभाळण्याची विनंती केली.श्रीमहाराज भगवंतौवाना म्हणाले की ही मुलगी पुढे महान साध्वी होणार आहे म्हणून मी हिची सांभाळण्याची जबाबदारी घेतो.श्रीमहाराजानी भगवंतौवाना सांगितल्याप्रमाणे श्रीलक्श्मीबाई अक्कांचा सांभाळ आपले मुलीप्रमाणे केला.श्री महाराजांचे अक्कांवर मुलीप्रमाणे तर अक्कांचे श्रीमहाराजांचेवर वडिलांप्रमाणे प्रेम होते.अक्कानी श्रीमहाराजांचेकडून अनुग्रह घेतला.एक चिंचेचे बुटूक व एक भाकर असे एकान्न खावून कट्टाने साधन केले.व श्रीमहाराजांचे घरातील पडेल ते काम केले.त्यांची उपासना सेवा पाहून श्रीमहाराजांची बहाल मर्जी त्यांचेवर बसली.श्रीमहाराज कुठेही गेले तरी अक्काना बरोबर न्हेत व प्रवासात सर्वतोपरी त्यांची काळजी घेत.एकदा अक्काना प्रवासात बरे न्हवते तेव्हा अक्का औषध नको असे म्हणाल्यावर स्वतः श्रीमहाराजानी औषध घेतले व आवश्यक ते पथ्य केले.औषध घेतले श्रीमहाराजानी व बरे वाटले अक्काना,हे केवढे विषेश आहे.पुढे श्रीमहाराजानी निर्याण केल्यावर श्रीमहाराजांचे ईच्छेप्रमाणे अक्का श्रीक्शेत्र चिमड येथे राहण्यास आल्या.चिमड येथे भरपूर साधन व श्रीचिमडमहाराजांचेबरोबर आत्मचिंतन करण्यात त्यांचा सारा काळ व्यतित होत असे.श्रीचिमडमहाराजांचेबरोबर आळंदीस गेल्या असताना 'देवाचिये द्वारी उभा क्शणभरी' हा चरण समाधीतून श्रीचिमडमहाराज व अक्का यानी ऐकला.श्रीचिमड्महाराजांचे निर्याणानंतर श्री अक्कानी या चिमड मठाची जबाबदारी समर्थपणे सांभाळली.श्रीदाजीसाहेबमहाराज जाणते मठाधीपती झाल्यावर सर्वाना सगळ्या सुचना देवुन सर्वाना सांगून सवरून आश्विन शु 3 शके 1819 रोजी या साध्वीने ईश्वर स्मरण करत निर्याण केले.